मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आनंदाची बातमी | Devendra Fadnavis Latest Update

2021-09-13 1

दादरच्या चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्मारक निर्माण करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एका महिन्यात प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली आहे.

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी चैत्यभूमीला भेट देऊन, बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींनी चैत्यभूमीतील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. चैत्यभूमीजवळ इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर डॉ. आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires